रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

'बॉईझ्' मधून सनीचे मराठीत पदार्पण

बॉलीवूडमध्ये अगदी अल्पावधीतच चाहत्यांची माने जिंकणारी बोल्ड अभिनेत्री सनी लिओन मराठीत पदार्पण करणार असल्याचे बोलले जात होते. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. कारण सनी लवकरच एका मराठी चित्रपटातून तिच्या चाहत्यांना सुखद धक्का देण्यास येत आहे. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बेनरखाली लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे निर्मित 'बॉईझ्' या चित्रपटात ती आयटम डान्स करताना दिसणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती स्वतः गायक अवधूत गुप्ते यानेच दिली आहे. आतापर्यत एकविरा प्रॉडक्शनअंतर्गत दिग्दर्शक संगीत दिग्दर्शक आणि निर्मात्याच्या भूमिकेत दिसणारा अवधूत ''बॉईझ्' या सिनेमाद्वारे प्रथमच प्रस्तुतकर्ता म्हणून लोकांसमोर येत आहे. 
 
विशाल देवरुखकर दिग्दर्शित या सिनेमात सनी थिरकणार असल्यामुळे, तिच्या तमाम मराठी चाहत्यांसाठी हा सिनेमा पर्वणीच ठरणार आहे. या बद्दल माहिती देताना अवधूतने सांगितले कि, 'सनी आमच्या चित्रपटात आयटम सॉंग करत आहे. आम्हाला या सिनेमाद्वारे मराठीत कधीच झाले नाही असे काही तरी करून दाखवायचे होते, त्यामुळे हिंदीच्या सुप्रसिध्द चेहऱ्याचा यात उपयोग करून घ्यायचे आम्ही ठरवले. निर्माते राजेंद्र शिंदे यांच्या पुढाकाराने सनी लिओन आमच्या सिनेमात शामिल झाली. ती आमच्या सिनेमाचा एक भाग झाली ही केवळ माझ्यासाठीच नव्हे तर आमच्या संपूर्ण टीमसाठी खूप आनंदाची बाब आहे' असे त्याने सांगितले. 
 
'बॉयझ्' या चित्रपटाच्या नावातूनच हा सिनेमा तरुण पिढीवर आधारित असल्याचे समजते. या आयटम सॉंगचे नुकतेच चित्रीकरण पूर्ण झाले असून, सनीदेखील त्यासाठी खूप उत्सुक असल्याचे दिसून आले. सुनिधी चौहानने गायलेल्या या आयटम गाण्याचे संगीत दिग्दर्शन अवधूत गुप्ते यानेच केले असून, हिंदीचे प्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य यांनी या गाण्यावर सनीला थिरकवले आहे.