बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (07:34 IST)

बिग बॉस मराठीच्या आतापर्यंतच्या सीझनमधील सर्वात उंच स्पर्धक

mahesh manjarekar
बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनला आजपासून सुरुवात झाली आहे. बिग बॉसचे सुत्रसंचालक महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत यंदाच्या सीझनचे स्पर्धक एकामागोमाग एक घरात दाखल होत आहेत. आतापर्यंत घरात दाखल झालेल्या स्पर्धकांपैकी एका हटके स्पर्धकानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. कारण हा स्पर्धक बिग बॉस मराठीच्या आतापर्यंतच्या सीझनमधील सर्वात उंच स्पर्धक ठरला आहे.
 
मूळचा अकलूजचा योगेश जाधव 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनमध्ये दाखल झाला आहे. योगेश एक फायटर असून तो अवघ्या २२ वर्षांचा आहे. पण त्याची उंची आणि ताकद पाहून घरातील सर्वच स्पर्धक भारावले आहेत. योगेश जाधव एक फायटर असून त्यानं महाराष्ट्राचं नाव उंचावलं आहे. जेंटल जाएंट म्हणून योगेश जाधवला ओळखलं जातं. योगेश पाहताच महेश मांजरेकर देखील त्याची उंची पाहून थक्क झालं आणि बिग बॉस मराठीच्या इतिहासातील सर्वात उंच स्पर्धक म्हणून त्याचा उल्लेख केला.

Edited by : Ratnadeep Ranshoor