शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (17:05 IST)

हर हर महादेव चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला

अलीकडे प्रदर्शित झालेल्या 'हर हर महादेव' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांच्या इतिहासाशी छेडछाड करून सिनेमात सादरीकरण केल्यावरून चित्रपटाच्या निर्मिते आणि दिग्दर्शकांना छत्रपती संभाजी राजे यांनी इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याशी संबंधित इतिहासाची मोडतोड करून सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली दाखवली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा इतिहासाची माहिती चुकीची दाखवली जाते.या वरून छत्रपती संभाजी राजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिनेमा बाबत आणि मावळ्यांच्या इतिहासाबाबत इतिहासाची केली जाणारी मोडतोड सहन करणार नाही असा इशारा चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना दिला आहे. त्यांच्या म्हणण्यावरून आता या चित्रपटासाठी पाडसाच्या उमटू लागले असून हर हर महादेव हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात पडला आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी चित्रपटाचा मुद्दा उपस्थित केला असून त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील समर्थन दिल आहे. त्यांनी ट्विट केले असून त्यात म्हटलं आहे ,की 'छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा आणि चुकीचा इतिहास दाखवण्याची परंपरा पुरंदरे ह्यांनी सुरु केली असून जाणता राजा हे महानाट्य हे त्याचे एक रुप कारण त्यांचे लिखित पुस्तक होतेच तीच परंपरा आता चित्रपटसृष्टीत काही जण करत आहेत  आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील त्यांना समर्थन दिलं असून त्यांनी ट्विट करत 'चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट तयार करताना छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याशी संबंधित पुरावे उपलब्ध असलेली माहिती तशीच दाखवावी त्याच्याशी कोणत्याही प्रकाराची छेडछाड करू नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी कोणती ही छेडछाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहन करणार नाही. 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायमच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभा असलेला पक्ष आहे. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी मोडतोड कदापि सहन केली जाऊ शकत नाही.असं ट्विट केलं आहे.

Edited  by - Priya Dixit