सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: रविवार, 5 फेब्रुवारी 2023 (17:44 IST)

ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबलची त्यांच्या लेकीसाठी भावुक पोस्ट

alka kubal
ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल - आठल्येयांचे नावंही अभिमानानं घेतलं जाते. सोशिक आणि आदर्श सूनची प्रतिमा त्यांनी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आणली आहे.
. त्यांच्या दोन्ही मुली आपल्याला क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत. त्यांना दोन मुली आहेत. ईशानी आठल्ये ही पायलट झाली आहे तर कस्तुरीनंही आपल्या क्षेत्रात एक खूप मोठं पाऊल टाकलं आहे. त्याबद्दल अलका कुबल यांनी एक भावनिक पोस्ट  शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 
त्यांनी इंस्टाग्राम पोस्ट वरून आपल्या धाकट्या मुलीचे कौतुक केले आहे.कस्तुरी हिने परदेशातून एमबीबीएसच शिक्षण घेतले असून तिला डर्मिटोलॉजिस्ट करायचे आहे. तिला परदेशात डॉक्टरेटची पदवी मिळाली असून तिच्या आईने म्हणजेच अभिनेत्री अलका कुबल यांनी पोस्ट शेअर केली आहे. 
 
त्यात त्यांनी लिहिले आहे. कस्तुरीने पहिल्याच प्रयत्नात FMGE परवाना परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. We are proud of You Dr . Kasturi Athalye .Best wishes  ,
त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली असून अनेकांनी त्यावर शुभेच्छा देत कंमेंट्स दिले आहेत.