गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 जानेवारी 2023 (15:57 IST)

अभिनेत्याच्या घरी चिमुकलीचं आगमन

Vijay Andalkar
अभिनेता विजय आंदळकर यांनी चाहत्यांना खुशखबर दिली आहे. अभिनेत्याने बाप झालो... लक्ष्मी घरी आली रे! अशी पोस्ट टाकत ही माहिती दिली.
 
'पिंकीचा विजय असो' फेम अभिनेता विजय आंदळकरने सोशल मीडियावर पोस्ट करत ही बातमी दिल्यानंतर चाहते आणि कलाकार देखील शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 
 
अभिनेत्याची पत्नी पत्नी रुपाली झणकरने मुलीला जन्म दिला आहे. विजयने काही महिन्यांपूर्वी गुड न्यूज असल्याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली होती. तसेच रुपालीने बेबी बम्पसोबत अनेक सुंदर फोटोशूट देखील केले होते. आता रुपालीने एका गोंडस लेकीला जन्म दिला आहे. डिसेंबर 2021 मध्ये विजय आणि रुपाली लग्नाच्या बंधनात अडकले होते.