विराटने आभार मानले
नवी दिल्ली- भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या ट्विटरवरील फालोअर्सची संख्या 80 लाखावर गेल्याने विराटने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याच्या नेतृत्वात नुकताच भारताने श्रीलंकेवर त्यांच्या देशात जाऊन 2-1 असा विजय मिळविला होता.
80 लाख फालोअर्सची संख्या ही खरोखर आनंददायी आहे. धन्यवाद अशा शब्दांत त्याने आभार मानले आहेत. उल्लेखनीय म्हणजे सचिनच्या ट्विटरवरील फालोअर्सची संख्या पावणे आठ दशलक्ष आहे.