मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 मार्च 2022 (22:51 IST)

क्रिकेट बॉलवर थुंकी लावण्यावर बंदी,तज्ञाच्या मते घाम प्रभावी आहे

क्रिकेटच्या खेळात वापरल्या जाणार्‍या चेंडूवर लाळ किंवा थुंकी लावण्याची  परंपरा 100 वर्षांहून अधिक काळापासून सुरू होती, परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे त्यावर बंदी घालण्यात आली होती. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ओसरला तरी ही ते सुरू झाले नाही. इतकेच नाही तर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी नियम बनवणाऱ्या मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (MCC) चेंडूवर लाळ किंवा थुंकी लावण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. 
 
2019 मध्ये, कोरोनामुळे जेव्हा चेंडूवर लाळ किंवा थुंकी लावण्यावर बंदी होती, तेव्हा काही गोलंदाजांनी त्याचे समर्थन केले नाही. तथापि, प्रत्येकाला परवानगी होती की चेंडूवर घाम लावू शकता . चेंडूवर घाम लावल्यानेही फायदा झाला आणि आता या कारणास्तव 1 ऑक्टोबर 2022 पासून चेंडूवर लाळ लावण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. तथापि, वेगवान गोलंदाजांना शिकवणारे क्रिकेट बायोमेकॅनिस्ट मार्क पोर्टेस यांचा दावा आहे की चेंडूला घाम लावणे खूप प्रभावी आहे.  
 
चेंडूची चमक वाढवण्यासाठी त्यावर थुंकी किंवा लाळ लावली जायची, पण आता फक्त घामाचा वापर केला जाईल."घाम पॉलिश केलेल्या चेंडू इतकाच प्रभावी आहे. मला वाटते की लाळेवर बंदी घालणे चांगले आहे.