थोडक्यात बचावले शेन वॉर्न बाईक चालवत असताना अपघात झाला, मुलगाही जखमी
ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नचा बाईक चालवताना अपघात झाला आहे. त्यामुळे ते जबर जखमी झाले. वॉर्न त्याचा मुलगा जॅक्सनसोबत बाईक चालवत होते . यादरम्यान बाईक घसरून ते खाली पडले आणि 15 मीटरपर्यंत फरफटत गेले. अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यादरम्यान त्यांच्या मुलालाही खूप दुखापत झाली.
शेन वॉर्न अपघात झाल्यानंतर म्हणले , मी या अपघातामुळे फार दु: खी आहे . यादरम्यान त्यांनी गंभीर दुखापतीपासून स्वतःचा बचाव केला असला तरी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना खूप वेदना होत होत्या. 52 वर्षीय शेन वॉर्न आपल्या पायाला आणि कमरेला दुखापत झाली असावी या भीतीने ते हॉस्पिटलमध्ये गेले . अपघातानंतर ते 15 मीटरपर्यंत फरफटले गेल्याचे वृत्त मिळाले आहे.