सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

गांगुलीच्या नावे ईडन गार्डन्समध्ये स्टँड

कोलकता- भारतीय क्रिकेट संघाला आक्रमकतेचे धडे देणारे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या सन्मानार्थ ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानातील एका स्टैंडला त्यांचे नाव दिले जाणार आहे. गांगुलीसह भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचेही नाव एका स्टैंडला दिले जाणार आहे.
 
ईडन गार्डन्स हे मैदान आणि त्याचा परिसर हा लष्काराच्या अधिपत्याखाली आहे. त्यामुळे येथे कोणताही बदल करण्यासाठी लष्कराची परवानगी घेणे आवश्यक असते. ईडन गार्डन्सवरील काही स्टैंडची दुरुस्ती, नूतनीकरण आणि त्यांचे नाव बदलण्यासाठी बंगाल क्रिकेट संघटनेने लष्कराकडे गेल्या वर्षी परवानगी मागितली होती.