गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : गुरूवार, 6 ऑगस्ट 2020 (13:15 IST)

अखेर 'ज्यूनिअर पांड्या'चं नाव ठरलं!

भारताचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya)आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. हार्दिक आपल्या लेकाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.
 
हार्दिकने आपल्याला मुलगा झाल्याचं सोशल मीडियावर सांगितलं आणि आपल्या बाळाचा पहिला फोटो शेअर होता. आता हार्दिकचा लेक (Hardik Pandya son)आणि नताशा (Natasha Stanokovic) घरी आले आहे. यावेळी माय-लेकाचे पांड्या कुटुंबियांनी जंगी स्वागत केले.
 
नताशा आणि बाळाच्या स्वागतासाठी कृणाल पांड्या आणि त्याची पत्नी या दोघांनी एक जंगी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमध्ये असलेल्या केकवरून हार्दिकच्या मुलाचे नाव समोर आले आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

दरम्यान, हार्दिकने अद्याप आपल्या मुलाने नाव अधिकृतपणे जाहीर केलेले नाही आहे. मात्र नताशा आणि बाळाच्या स्वागतासाठी आणण्यात आलेल्या केकवर बाळाचे नाव लिहिण्यात आले आहे.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोवर हार्दिकच्या बाळाचे नाव अगस्त्य लिहिले आहे. या केकवर नॅट्स (नताशा) आणि अगस्त्य असं लिहिलं आहे.