गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

महिला विश्व चषक : इंग्लंडचा भारतावर ९ धावांनी विजय

icc cricket news
मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने भारतावर ९ धावांनी मात केली. हरमनप्रीत कौर आणि पुनम राऊत यांनी केलेल्या भागीदारीमुळे भारत विजयाच्या नजीक येऊन पोहचला होता. हरमनप्रीत कौर बाद झाल्यानंतर पुनमने वेदा कृष्णमुर्तीच्या सहाय्याने भारताचा डाव सावरला खरा , मात्र पुनम राऊत बाद झाल्यानंतर भारतीय डावाला जी घसरगुंडी लागली, ती थांबलीच नाही. एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले.  ज्याचा परिणाम म्हणून इंग्लंडने भारतावर अंतिम फेरीत ९ धावांनी मात केली.
Photo credit : ICC