शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 28 नोव्हेंबर 2021 (14:55 IST)

IND vs NZ:पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकवणाऱ्या श्रेयस अय्यर ने , एमएस धोनीचे वैशिष्टये सांगितले

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कानपूरमध्ये खेळवला जात आहे. टीम इंडियाच्या पदार्पणाच्या सामन्यात श्रेयस अय्यरने आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने पदार्पणाच्याच सामन्यात शतक झळकावले. यासह, पहिल्या कसोटीत शतक झळकावणारा तो 16वा भारतीय क्रिकेटपटू ठरला. या यादीत लाला अमरनाथ, गुंडप्पा विश्वनाथ, सौरव गांगुली, रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांची नावे आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्याने पत्रकार परिषदेत एमएस धोनीचे कौतुक केले.  
 
ते  म्हणाले , 'मी जेव्हा रिहॅबमध्ये होतो तेव्हा माही भाई आणि मी आयपीएलबद्दल बोललो होतो. मी बॉलीवूड मित्र आणि त्यांच्यासोबत फुटबॉल खेळायला गेलो होतो. ते  खरोखर शांत आणि सहनशील आहे. जेव्हा कधी त्यांच्याशी गप्पा करायला जातो तेव्हा ते अनेक अनुभव शेअर करतात . अय्यरने पदार्पणाच्या सामन्यात 171 चेंडूत 105 धावा केल्या. त्याने रवींद्र जडेजासोबत शतकी भागीदारी केली. जडेजाने 50 धावा केल्या. साऊदीने किवी संघाचे सर्वाधिक चार बळी घेतले.
भारताचा पहिला डाव 345 धावांवर आटोपला. यानंतर न्यूझीलंडने पहिल्या क्रिकेट कसोटीच्या दुस-या दिवशी दमदार सुरुवात करताना कोणतेही नुकसान न करता 129 धावा केल्या. यंगने 180 चेंडूत 12 चौकारांसह 75 धावा केल्या आहेत तर लॅथम 165 चेंडूत 50 धावा खेळत आहे. न्यूझीलंडचा संघ भारताच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा 216 धावांनी मागे आहे आणि त्यांच्या सर्व विकेट सुरक्षित आहेत.