शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (15:14 IST)

IND vs NZ: टीम इंडियाच्या या चमकत्या स्टारचा न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी संघात समावेश!

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप केल्यानंतर टीम इंडिया आता दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. उभय संघांमधला पहिला कसोटी सामना 25 ते 29 नोव्हेंबर दरम्यान कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरी कसोटी 3 ते 7 डिसेंबर दरम्यान मुंबईत होणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा पहिल्या कसोटीत खेळत नसल्यामुळे सूर्यकुमार यादवचा भारताच्या कसोटी संघात समावेश केला जाऊ शकतो. सूर्यकुमारची भारतीय संघात केवळ टी-20 मालिकेसाठी निवड झाली होती. भारताकडून एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळलेला सूर्यकुमार अजूनही कसोटी पदार्पणाच्या प्रतीक्षेत आहे.
पहिल्या कसोटीत अजिंक्य रहाणे भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा भाग आहे आणि न्यूझीलंड हे गतविजेते आहेत. एका वृत्त पत्रानुसार, कानपूरमधील पहिल्या कसोटीसाठी सूर्यकुमार यादवला टीम इंडियामध्ये सामील होण्यास सांगण्यात आले आहे. एका सूत्राने सांगितले की, “सूर्यकुमार यादव कसोटी संघात पुनरागमन करत आहे. तो कोलकाताहून कानपूरला जाईल आणि भारताच्या कसोटी संघात सामील होईल.
31 वर्षीय सूर्यकुमारने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात शानदार 62 धावा केल्या. पण पुढच्या 2 सामन्यात तो अनुक्रमे 1 आणि 0 वर बाद झाला. सूर्यकुमारने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 77 सामने खेळले असून 44 च्या सरासरीने 5,326 धावा केल्या आहेत. यामध्ये 14 शतके आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे. याआधी सूर्यकुमार इंग्लंड दौऱ्यावरही भारतीय संघाशी जोडले  गेले  होते . श्रीलंका दौऱ्यानंतर तयांना आणि पृथ्वी शॉला इंग्लंडला पाठवण्यात आलं होतं. मात्र, सूर्यकुमारला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.