बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (19:45 IST)

IPL 2022 Mega Auction : लिलावासाठी खेळाडू तयार, बजेट किती असेल जाणून घ्या

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या नवीन हंगामासाठी मेगा लिलाव आता अगदी जवळ आला आहे. मंगळवारी सर्व खेळाडूंची यादी समोर आली असून त्यात एकूण 590 खेळाडूंची नावे आहेत. ज्यांच्यावर पैशांचा वर्षाव होऊ शकतो. 
 
मेगा लिलावापूर्वी, सर्व संघांनी आपापल्या काही खेळाडूंना कायम ठेवले होते, त्यामुळे आता सर्व संघांना ओळखले जाणारे खेळाडू विकत घेण्यासाठी जागा असेल. तसेच प्रत्येक संघाचे निश्चित बजेट असेल.
या मेगा लिलावासाठी प्रत्येक संघाचे बजेट 90 कोटी रुपयांपर्यंत आहे, या पैकी अनेक संघानी टिकवून ठेवण्यासाठी पैसेही खर्च केले आहे. 

इंडियन प्रीमियर लीगचा मेगा लिलाव 12, 13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरूमध्ये होणार आहे. यावेळी लिलावासाठी एकूण 590 खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. रविचंद्रन अश्विन, श्रेयस अय्यर, डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन यांच्यासह अनेक मोठी नावे आहेत, ज्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.