रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 27 डिसेंबर 2021 (16:46 IST)

द्रविडने पुन्हा एकदा मन जिंकले

चेतेश्वर पुजाराची कसोटी सामन्यातील खराब कामगिरी कायम आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन येथे खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या पहिल्या डावात पुजारा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. तत्पूर्वी, भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाची सलामी जोडी केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी शानदार फलंदाजी करताना शतकी भागीदारी केली. अर्धशतक झळकावल्यानंतर अग्रवाल बाद झाला आणि एका चेंडूनंतर पुजाराच्या रूपाने भारताला दुसरा धक्का बसला.

चेतेश्वर पुजारा गेल्या काही काळापासून बॅटमध्ये झगडत आहे. त्याचे शेवटचे कसोटी शतक जानेवारी 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवले गेले होते. तेव्हापासून त्याच्या फलंदाजीच्या सरासरीत सातत्याने घसरण होत आहे. पुजारा शून्यावर बाद, द्रविडची ड्रेसिंग रूममध्ये प्रतिक्रिया पुजाराच्या बाद झाल्यानंतर चाहते सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल करत आहेत. दरम्यान, एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ड्रेसिंग रूममध्ये पुजाराच्या पाठीवर थाप देत आहेत. हे फुटेज पुजारा बाद झाल्यानंतरचे आहे, जेव्हा तो बाकीच्या खेळाडूंसोबत चेंज रूममध्ये उभा होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते प्रशिक्षक द्रविडचे कौतुक करत आहेत.