बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020 (08:05 IST)

टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी घोषणा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा हा मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेला मुकणार असं दिसत आहे. कारण आयपीएलदरम्यान जखमी झालेल्या रोहितला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
 
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही मालिका 27 नोव्हेंबरपासून सिडनीत सुरू होण्याची शक्यता आहे. वनडे आणि टी-ट्वेन्टी संघाची घोषणा करण्यात आली असून या दोन्ही फॉरमॅटसाठी विराट कोहली हाच भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे. तर जखमी रोहित शर्माच्या जागी मयांक अग्रवाल याला संधी देण्यात आली आहे. तर रोहितच्या अनुपस्थितीत उपकर्णधारपदाची जबाबदारी के एल राहुलच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.
 
टी-ट्वेन्टी मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अग्रवाल, के एल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरून चक्रवर्ती
 
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, के एल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर