रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : गुरूवार, 15 जुलै 2021 (20:07 IST)

मोठी बातमी, इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियामध्ये कोरोनाची लागण

4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय संघाच्या एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे, त्यानंतर त्याला क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे. वृत्तानुसार, हा खेळाडू आपल्या नातेवाइकाच्या घरी आइसोलेशनमध्ये आहे. बायो-बबलपासून 20 दिवसांच्या विश्रांतीनंतर, सर्व खेळाडू गुरुवारी संघात परत येतील.
 
बीसीसीआयच्या एका सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, “हो, आता एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे, जरी सध्या त्याला बरे वाटत आहे. नातेवाइकाच्या घरी आइसोलेशनमध्ये आहे आणि टीमबरोबर डोरहॅमला जाणार नाही. इंग्लंडमधील कोविड -19 च्या अलीकडील परिस्थितीचा विचार करता बीसीसीआय सचिव जय शाह यांनी टीम इंडियाला एक ईमेल पाठविला तेव्हा हा खुलासा झाला. गुरुवारी डरहॅममध्ये २० दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघ पुन्हा एकत्र होईल, तेथे २० जुलैपासून तीन दिवसांचा सराव सामना खेळला जाणार आहे.
 
भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून 8 गडी राखून पराभवाला सामोरे जावे लागले. ज्यानंतर टीम इंडिया आणि कॅप्टन कोहली यांच्यावर जोरदार टीका झाली. आजकाल इंग्लंडमध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. अलीकडेच इंग्लंडमध्ये खेळल्या जाणार्या युरो चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लिश संघाचा पराभव झाल्यानंतर चाहत्यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केले आणि रस्त्यावर जोरदार निदर्शने केली. पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडला अंतिम सामन्यात इटलीकडून पराभव पत्करावा लागला होता.