शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

आता विराट मादाम तुसाँ संग्रहालयात

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या मादाम तुसाँ संग्रहालयातील मेणाच्या पुतळ्याचं अनावरण झाले आहे. राजधानी दिल्लीत हा सोहळा रंगला. यामुळे विराट कोहलीला लिओनेल मेस्सी, कपिल देव आणि उसेन बोल्ट यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळाले आहे.
 
“मादाम तुसाँ सारख्या संग्रहालयात माझा मेणाचा पुतळा उभारला गेला ही माझ्यासाठी मानाची गोष्ट आहे. यासाठी मी मादात तुसाँचा आयुष्यभर ऋणी राहीन. हा अनुभव माझ्यासाठी आयुष्यभर स्मरणात राहिलं, यावर माझे चाहते काय प्रतिक्रीया देतात हे मला पहायचं आहे.” विराट कोहलीने आपलं मत व्यक्त केलं आहे.