दिल्लीत बर्गरमध्ये प्लॅस्टिक, तरुण आजारी, मॅनेजरला अटक
दिल्लीत एक तरुणाला मेट्रो स्टेशनहून बर्गर खरेदी करून खाणे तेव्हा महागात पडले जेव्हा त्यात प्लॅस्टिक आढळले आणि त्याच्या गळा जखमी झाला. नंतर त्याला रुग्णालयात हालवण्यात आले. पोलिसाने शिफ्ट मॅनेजरला अटक केली.
मिळालेल्या बातमीप्रमाणे दिल्लीच्या राजीव चौक मेट्रो स्टेशनवर एका प्रसिद्ध अमेरिकी फास्ट फूड चेन बर्गर किंग येथून राकेश कुमार नावाच्या तरुणाने बर्गर खरेदी केला होता. खातानाच त्यात काही ठोस वस्तू असल्याचे त्याला जाणवले. कारण बर्गरमध्ये प्लॅस्टिकचा तुकडा होता ज्यामुळे त्याच्या गळा जखमी झाला.
नंतर राकेश कुमारला मळमळू लागले आणि त्यांना लेडी हार्डिंग रुग्णालयात घेऊन गेले. या प्रकरणी तरुणाच्या तक्रारीवर पोलिसांनी शिफ्ट मॅनेजरला अटक केली नंतर जामिनावर सोडण्यात आले.
काही महिन्यापूर्वी देखील चिली बर्गर खाण्याने दिल्लीच्या एका तरुणाच्या पोटातील आतील भागाला नुकसान पोहचले होते. त्या तरुणाने एक रेस्टॉरन्टमध्ये चिली बर्गर खाण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता, ज्यात जिंकल्यास एका महिन्यापर्यंत रेस्टॉरन्टमध्ये फ्री जेवण मिळणार होते. तरुण विजेता तर ठरला पण दुसर्या दिवशीच त्याला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या होत्या, ज्यामुळे त्यालाही रुग्णालयात भरती करावे लागले होते.