सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018 (11:21 IST)

IND VS WI : कोहलीचे शतक पण रिषभ पंतचे शतक हुकले

पहिल्या दिवशी पृथ्वी शॉने केलेल्या शतकानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही वेस्ट इंडिजविरुद्ध शतकी खेळीची नोंद केली आहे. ऋषभ पंतच्या साथीने संघाचा किल्ला लढवत विराटने आपल्या कारकिर्दीतलं २४ वं शतक झळकावलं. दुसऱ्या बाजूने ऋषभ पंतनेही आक्रमक फटकेबाजी करत विराटला चांगली साथ दिली. वेस्ट इंडिजच्या फिरकीपटूंवर आक्रमण करत पंतने काही चांगले फटके खेळले. दुसऱ्या बाजूने ऋषभ पंत आपलं शतक साजरं करेलं असं वाटत असतानाच देवेंद्र बिशूच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद होऊन माघारी परतला.