मंगळवार, 29 एप्रिल 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

होमवर्क म्हणजे वेळेचा अपव्यय!

WD
जगातील सर्वच शाळांमध्ये मुलांना होमवर्क करून आणण्यासाठी सांगितले जाते. होमवर्क केल्याने मुलांची स्वअध्ययन क्षमता बळावते,असा दावा शिक्षरतज्ज्ञ करत असेल तरीसुद्धा होमवर्कचा मुलांना प्रत्यक्षपणे कुठलाही फायदा होत नसल्याचे नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. गृहपाठ म्हणजे वेळेचा अपव्यय असल्याचा दावा ब्रिटनमधील संशोधकांनी केला आहे. यासाठी त्यांनी तब्बल अठरा हजार विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले होते. गृहपाठामुळे विद्यार्ध्यांचे परीक्षेतील गुण वाढत असले तरीसुद्धा त्यांच्या एकूण बुद्धिमत्तेत त्यामुळे फारशी सुधारणा होत नसल्याचे दिसून आले आहे. व्हर्जिनिया विद्यापीठातील संशोधनकांनी हे संशोधन केले आहे. ब्रिटनमधील शिक्षपद्धती कितीही प्रगत झाली असली तरीसुद्धा तेते आजही मोठ्याप्रमाणावर अध्ययनाच्या पारंपरिक पद्धतीच प्रचलित आहेत. त्यात बदल करण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ आरि अभ्यासक युद्धपातळीवर कामाला लागले आहेत.

WD
आधुनिक तंत्रज्ञान आणि विद्यार्थ्यांचे उपजत कौशल्य यांची सांगड घालून एक सक्षम शिक्षणपद्धती तयार करण्यावर त्यांचा भर आहे. त्यातून शैक्षणिक क्षेत्रात नवनवे संशोधन होताना आपल्याला दिसून येते. होमवर्क केल्याने विद्यार्थ्यांची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा कारण नसतानाही व्यर्थ वाया जाते, असेही ब्रिटिश अभ्यासकांनी म्हटले आहे.