महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 134 जागा
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महाजनको) येथे सिस्टिम अनॉसिस्ट (3 जागा), सहायक संचालक-सुरक्षा (2 जागा), उपमुख्य अग्निशमन अधिकारी (4 जागा), फायर ऑफिसर (1 जागा), सुरक्षा अधिकारी (1 जागा), असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर (1 जागा), लेखा अधिकारी (5 जागा), प्रोग्रामर (3 जागा), उप अग्निशमन अधिकारी (2 जागा), सहायक कल्याण अधिकारी (2 जागा), सहायक प्रोग्रामर (5 जागा), इस्टॉब्लिशमेंट सुपरवायझर (1 जागा), कनिष्ठ अग्निशमन अधिकारी (27 जागा), कनिष्ठ सुरक्षा अधिकारी (17 जागा), स्टेनोग्राफर -मराठी (4 जागा), स्टेनोटायपिस्ट-मराठी (5 जागा), फायरमन (53 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2009 आहे. अधिक माहिती www.mahagenco.in तसेच www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (
महान्यूज)