पदवीधारींना सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्ण संधी, त्वरा अर्ज करा
जम्मू काश्मीरच्या सेवा निवड मंडळाने अनेक विभागाच्या रिक्त पदांवर भरतीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून विविध विभागातील 1700 रिक्त पदांना भरले जाणार आहे. या सर्व पदांसाठी विभागाकडून पात्रता आणि वय मर्यादा देखील वेगवेगळ्या निश्चित केल्या आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 16 जानेवारी 2021 किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. उमेदवार जम्मू-काश्मीर सेवा निवड मंडळाच्या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.
पदांचा तपशील -
1246 पदे अर्थ किंवा फायनान्स साठी, 144 पदे परिवहनासाठी, 137 पदे निवडणुकीसाठी, 79 पदे संस्कृतीसाठी. 78 पदे कामगार आणि रोजगारासाठी आणि 16 पदांवर आदिवासी कार्य साठीची भरती केली जाणार आहे.
अर्ज फी -
उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 350 रुपये आकारावे लागणार. अर्ज फी केवळ नेट बँकिंग, क्रेडिट किंवा डेबिट कार्डाद्वारेच भरू शकता.
वय मर्यादा-
वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या वय मर्यादा निश्चित केल्या आहे किमान वय मर्यादा 40 वर्ष आणि कमाल वयो मर्यादा 48 वर्ष निश्चित केली आहे.
शैक्षणिक पात्रता-
उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त महाविद्यालय किंवा संस्थेतून पदवीधर/पदव्युत्तर किंवा पीएचडी पदवी असणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. उमेदवारांना अधिक माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत सूचना वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
नंतर अप्लाय वर क्लिक करा.
नोंदणी करण्यासाठी नोंदणी पेजवर लॉग इन करा.
या साठी आपल्याला आपले नाव, ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर भरावे लागेल.
या नंतर ऑनलाईन अर्ज भरा आणि कागदपत्र अपलोड करा.
या नंतर अर्ज पूर्ण करण्यासाठी शुल्क आकारा.