रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (14:41 IST)

मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये 23 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळा, या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी

मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळमध्ये तरुणांसाठी 23 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा रोजगार अधिकर्‍याप्रमाणे राजधानीच्या गोविन्दपुरा भागात स्थित मॉडल आयटीआय मध्ये रोजगार मेळावा सकाळी 10 वाजेपासून आयोजित होणार आहे. या मेळाव्यात दहावी, बारवी, पदवीधर, बी.कॉम, बी.एससी, आयटीआय डिप्लोमा, एमबीए आणि इतर योग्य उमेदवारांना ज्यांचे वय 18 ते 40 वर्ष दरम्यान असेल त्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळेल. नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना आपल्यासोबत शैक्षणिक योग्यतेतेच मूळ प्रमाण-पत्र, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटोग्राफ सोबत आणावे लागेल.
 
या मेळाव्यात एल.एंड टी कंट्रक्शन प्रा.लि. अहमदाबाद, मॅग्नम बीपीओ प्रा.लि. भोपाळ, एजिस प्रायव्हेट लिमिटेड भोपाळ, नवकिसान बायो प्लांटेक भोपाळ, वर्डवाइड स्माल डायमंड कंपनी भोपाळ, मेसर्स वैष्णव इंडस्ट्रीज, मेसर्स स्वीगी अशोक गार्डन भोपाळ, अनन्या पैकेजिंग प्रा.लि. मंडीदीप, नवकिसान बायोटेक्नोलॉजी भोपाळ, एलआईसी भोपाळ, आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इंश्योरेंस, भास्कर इंडस्ट्रीज मंडीदीप, वर्धमान यार्न सतलापुर मंडीदीप, जे.के.बायो एग्रीटेक, आदित्य इव्हेंट, आय.पी.एस.ग्रुप बंगलुरु, ग्रोफास्ट आरगिन डायमंड प्रा.लि., वैकमेट प्रा.लिमिटेड कंपन्या तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देतील.