रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (08:27 IST)

तब्बल 500 हून अधिक पदांची भरती जाहीर ! जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तांत्रिक सेवांसाठी विविध पदांसाठी भरती प्रसिद्ध केली आहे.
 
या भरतीच्या प्राथमिक परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र आणि इच्छुक उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
 
या पदांवर भरती होणार आहे
एमपीएससीने जाहीर केलेल्या भरतीद्वारे, निवड झालेल्या उमेदवारांना वनरक्षक, कृषी अधिकारी, सहायक कार्यकारी अधिकारी, सहायक अभियंता आणि उपविभागीय जलसंधारण अधिकारी या रिक्त पदांवर नियुक्ती दिली जाईल. भरतीमध्ये एकूण 588 रिक्त पदे आहेत. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध अधिसूचना पाहू शकतात.
 
14 मार्चपर्यंत अर्ज करा
MPSC तांत्रिक सेवा भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 21 फेब्रुवारी 2022 पासून सुरू झाली आहे. उमेदवार 14 मार्च 2022 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.
 
उमेदवारांनी नोंद घ्यावी की ही एक महत्त्वाची भरती आहे आणि त्यासाठी मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज करतील. शेवटच्या क्षणी अधिकृत वेबसाइट ओव्हरलोड झाल्यामुळे, उमेदवारांना अर्ज करताना देखील अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर अर्ज करा.
 
ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख – २१ फेब्रुवारी २०२२
अर्ज करण्याची अंतिम तारीख – मार्च 14, 2022
प्राथमिक परीक्षेची तारीख – 30 एप्रिल 2022
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
 
एमपीएससी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून पदांनुसार पात्रता मागविण्यात आली आहे. हे जाणून घेण्यासाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध अधिसूचना तपासू शकतात.
 
अर्जदारांची कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे असावी. प्राथमिक परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल.
 
अर्ज कसा करायचा?
पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.