रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शनिवार, 25 एप्रिल 2020 (06:36 IST)

वाचा, अशी आहे कोकण रेल्वेमध्ये निघालेली भरती

कोकण रेल्वेमध्ये ऑफिस असिस्टन या पदासाठी ही भरती निघाली असून विशेष बाब म्हणजे ४० वर्षापर्यंतच्या व्यक्ती या पदासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. येत्या २७ एप्रिलपर्यंत अर्ज करु शकता येतील. ज्या व्यक्तींनी अद्याप अर्ज केलेला नाही अशा व्यक्ती konkanrailway.com या संकेतस्थळावर अर्ज करु शकणार आहेत. विशेष म्हणजे १ जानेवारी २०२० ला ज्या व्यक्तींचे वय ३५ ते ४० या वयोगटामध्ये असेल अशा व्यक्ती या संधीचा फायदा घेऊ शकणार आहेत.
 
ज्या व्यक्ती नोकरीसाठी अर्ज करणार आहेत, अशा व्यक्ती कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे गरजेचे आहे. तसेच शैक्षणिक पात्रतेसह, उमेदवारांना सरकारी विभाग किंवा पीएसयू संस्थांकडून प्रोटोकॉल किंवा परवाना शुल्कात किमान ५ वर्षांचा अनुभव असावा. त्यासोबतच या व्यक्तीला कम्प्युटर application, इंटरनेट, एमएस ऑफिस या गोष्टींचे देखील नॉलेज असणे गरजेचे आहे. यासोबतच विमानाचे आणि ट्रेनचे तिकीट देखील बुक करता आले पाहिजे. दरम्यान, अर्ज करताना ५०० रुपयाचा डिमांड ड्राफ काढावा लागणार आहे.

हा अर्ज कोकण रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची पत्र जोडणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे हा अर्ज तुम्ही कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, बेलापूर भवन, सेक्टर – ११ सीबीडी/बेलापुर नवी मुंबई – ४०००६१४१ या पत्त्यावर पाठवू शकता.