शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: गुरूवार, 12 नोव्हेंबर 2020 (14:12 IST)

चांगली बातमी : दिल्ली मेट्रोमध्ये नोकरी, पगार 1 लाख 50 हजाराहून अधिक

जर आपण नोकरीच्या शोधात आहात, तर दिल्ली मेट्रोमध्ये सहाय्य्क व्यवस्थापक (असिस्टेंट मॅनेजर) पदासाठी नोकरी निघाली आहे. या नोकरीसाठी आपण 26 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे की या नोकऱ्या मध्ये पगार खूप चांगला मिळत आहे. जे 1 लाख 50 हजारांपेक्षा जास्त आहे. 
 
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) ने सहाय्य्क व्यवस्थापक (असिस्टेंट मॅनेजर) पदासाठी भरती काढली आहेत. इच्छुक उमेदवार 26 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करू शकतात. ही भरती एकूण 2 पदांसाठी आहे. ज्यासाठी 35 वर्ष वयाची मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
 
या नोकरीसाठी पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात 26 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करावे. उमेदवार दिल्ली मेट्रोचे अधिकृत संकेत स्थळ delhimetrorail.com च्या माध्यमातून दिलेल्या उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. तथापि या जागेसाठी जरी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की पदांची संख्या कमी जास्ती होऊ शकते. 
 
या पदांसाठी शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची यादी डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात DMRC च्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात येईल. डिसेंबर अखेर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. उमेदवारांना मुलाखतीसाठी मेट्रो भवन येथे बोलावले जाणार. या पदांसाठी केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारमध्ये कार्यरत असलेले अर्ज करू शकतात.
 
उमेदवार ज्यांचा पगार 15600 रुपये ते 39100 रुपये, आणि जीपी 5400 असेल ते अर्ज करू शकतात. या शिवाय त्यांचा कडे कोणत्याही सरकारी संस्था आणि पीएसयू मध्ये दोन वर्षाचा कामाचा अनुभव असावा. 
 
तपशिलासाठी अधिकृत संकेतस्थळ आणि सूचना बघा.
 
 सूचना वाचण्यासाठी येथे