रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By

हवीच गळ्यात मोत्यांची माळ

फॅशनमध्ये नवा ट्रेंड काय येईल, ते सांगता येत नाही. अगदी कशाचीही फॅशन येऊ शकते. सोने, चांदी, हिरे या आकर्षित करणार्‍या दागिन्यांमध्येच मोतीही मोडतो. मोती दिसायला तसा नाजूक परंतु, त्याचे फायदे मात्र अनेक आहेत. रोमन साम्राज्यात मोत्याला खूप मान होता. समुद्राच्या तळाशी असलेल्या शिंपल्यात मोती सापडतो. मोत्याच्या दागिन्यांची लोकप्रियता आजही कायम आहे. 
 
19 व्या शतकात हेनरी फिलिपने 2 इंच लांब असलेल्या मोत्याचा शोध लावला होता. ब्रिटिश संग्रहालयात तो जपून ठेवण्यात आला आहे. समुद्रात सापडणारे मोती निमुळते असतात. त्यामुळे त्यांना कारागीरांकडून गोलाकार रूप दिले जाते. हल्ली अनेक कंपन्या मोत्यांचे उत्पादन करत आहेत. विविध आकारात व प्रकारात येणार्‍या मोत्यांनीने महिला-पुरूषांच्या दागिन्यांमध्ये स्थान मिळवले आहे. 
 
इव्हिनिंग वेयर, सूट व साडी यावर मोत्याचा नेकलेस किंवा इतर दागिणे म्हणजे 'परफेक्ट मॅचिंग' आहे. मोती शुभ्र, गुलाबी व क्रीम रंगात येतात.
 
इतर राशीच्या रत्‍नाप्रमाणे मोतीही राशीचा रत्न आहे. ग्रह शांतीसाठी सोने किंवा चांदीमध्ये मोती परिधान करावा लागतो. महिलापासून तर महाविद्यालयातील तरूणीपर्यत मोत्याच्या दागिन्यांची मागणी आहे. मोत्यांच्या रंगबिरंगी अंगठ्या, नेकलेस, कानातील डूल व ब्रेसलेट आपले लक्ष वेधून घेत असतात. परदेशातही मोत्याचे दागिन्यांची फॅशन आहे.