बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

आकाशात इंद्रधनुष्य कसा बनतो जाणून घेऊ या.

आपण बऱ्याच वेळा बघितले असणार की पाऊस पडल्यावर आकाशात सात रंगांची एक सुंदर आकृती दिसते ज्याला आपण इंद्रधनुष्य असे म्हणतो. परंतु आपण कधी विचार केला आहे की आकाशात हे इंद्रधनुष्य कसे तयार होते ? चला तर मग जाणून घेऊ या. 
खरं तर पाऊस पडल्यावर आकाशात पाण्याचे काही थेंब आकाशात राहतात आणि पाऊस पडल्यावर सूर्य बाहेर निघाल्यावर या थेंबांवर सूर्याचा प्रकाश पडतो आणि  या थेंबा प्रिझ्म म्हणून काम करतात आणि सूर्याच्या किरणा सात रंगांमध्ये वाटल्या जातात आणि इंद्रधनुष्य तयार होतो.इंद्रधनुष्य नेहमी संध्याकाळच्या वेळी पूर्व दिशेला आणि सकाळच्या वेळी पश्चिमी दिशेला दिसतो . या इंद्रधनुष्याच्या रंगात लाल रंग सर्वात बाहेर आणि जांभळा रंग सर्वात आत असतो.