शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: बुधवार, 19 मे 2021 (08:11 IST)

कुतुब मिनार चे बांधकाम कोणी करविले

या प्रश्नाचे उत्तर नीट वाचणे महत्वाचे आहे. कुतुब मीनारचे बांधकाम कुतुबुद्दीन ऐबक यांनी 1193 मध्ये सुरू केले होते.परंतु ऐबकने फक्त काम सुरु करविले आणि त्याचे निधन झाले.इल्तुतमिश ने जो ऐबकच्या मृत्यूनंतर त्याच्या गादीवर बसला होता .त्या इमारतीत तीन मजल्यांची जोडणी करविली. कुतुब मिनार ला आग लागल्यावर त्याची पुनर्बांधणी फिरोजशाह तुगलकच्या कालावधीत झाली. विद्यार्थ्यांनी हे विसरू नये. बरेच विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेत घाईघाईने चुकीचे उत्तरे देतात. 
लक्षात असू द्या की कुतुबमिनार च्या बांधणीचे काम कुतुबुद्दीन ऐबक ने करविले आणि त्या बांधकामाला पूर्ण केले इल्तुतमिश यांनी आणि 1386 मध्ये या मिनारच्या अग्निकांडाच्या अपघातानंतर डागडुजी करविली ती फिरोजशाह तुगलक याने.काही इतिहासकारांचे मत आहे की या कुतुब मिनाराचे नाव कुतुबुद्दीन ऐबक च्या नावावरून ठेवण्यात आले तर काही सांगतात की बगदादच्या एका संत कुतुबुद्दीन बख्तियार काकी यांच्या नावावर याचे नाव ठेवण्यात आले. काकी नंतर भारतातच वास्तव्यास होते. 
इल्तुतमिश त्यांना फार मानायचा.सुमारे 72.5 मीटर उंच ही मिनार युनेस्कोच्या जागतिक वारसा स्मारकांच्या यादीत समाविष्ट आहे.