शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : शनिवार, 12 ऑगस्ट 2023 (07:44 IST)

Shani Sade Sati शनिदेवाची साडे साती आयुष्यात किती वेळा येते?

shani sade sati
Shani Sade Sati जेव्हा शनिदेव एखाद्याला शिक्षा देतात तेव्हा त्याच्या आयुष्यात साडेसाती आणि ढैय्याचे चक्र सुरू होते. साडेसाती सात वर्षांसाठी तर ढैय्या अवघ्या अडीच वर्ष असते. यावेळी खूप त्रास होतो. विशेषत: साडेसातीच्या प्रदीर्घ काळात माणसाला आत्यंतिक दुःखाचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया माणसाला किती वेळा आणि कोणत्या वेळी साडे साती सहन करावी लागते.
 
साडे साती किती वेळा येते?
साडे साती कोणत्याही एका राशीत येत नाही. त्याच्या प्रभावाखाली अनेक राशी एकत्र येतात. साडे सातीच्या प्रभावामुळे काही राशींना 7 वर्षे शनीची तीव्र गती सहन करावी लागते. 
ज्या राशीत शनि बसलेला असतो, त्या राशीच्या पुढे एक आणि एक मागे ती राशीही पकडमध्ये येते. 
शनीला 12 राशींमधून प्रवास करण्यासाठी 30 वर्षे लागतात. ते प्रत्येक राशीमध्ये अडीच वर्षे राहतात.
 अशा स्थितीत ज्योतिषीय गणनेनुसार प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात साडेसाती तीनदा येते. 
म्हणजेच दर 30 वर्षांनी माणसाला शनि सतीचे चक्र भोगावे लागते.
 
काय आहे साडेसातीचा प्रभाव? 
साडेसाती सुरु होते तेव्हा शनी दंडनायक या भूमिकेत असतात आणि ते व्यक्तीच्या कर्माचे हिशोब करतात.
साडेसाती दरम्यान व्यक्तीला आर्थिक, मानसिक आणि शारीरिक कष्ट भुगतावे लागतात.
शनी साडेसाती अडीच-अडीच वर्षांच्या तीन तीन अंतराने येतो. प्रथम अंतरालात आर्थिक समस्या येते.
दुसर्‍या आणि तिसर्‍या अंतरालात कार्यक्षेत्र, कौटुंबिक जीवन आणि आरोग्यावर प्रभाव पडतो.
 
ज्या राशीवर साडेसातीचा प्रभाव आहे त्या जातकांनी महादेव आणि हनुमान यांची पूजा करावी.