गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

कोट्यधीश व्हायचं असेल तर या वनस्पती जवळ ठेवा

पर्वतीय क्षेत्रात आढळणार्‍या अनेक दुर्लभ वनस्पती आपल्याजवळ ठेवल्याने जीवनात कोणत्याही प्रकाराच्या संकटाला सामोरा जावं लागत नाही. याने आपल्या सिद्धी आणि धन प्राप्ती होईल. जाणून घ्या अश्या वनस्पती आणि त्याचे लाभ...
 
1) पारिजातक किंवा प्राजक्ताचा बांदा
पारिजातक किंवा प्राजक्ताचा बांदा लाल कापडात गुंडाळून तिजोरीत ठेवावे, धन अभाव दूर होईल.
 
2) शंखपुष्पी मूळ
शंखपुष्पीचे मूळ रवि-पुष्य नक्षत्रात आणून चांदीच्या डबीत ठेवावे. हे घराच्या तिजोरीत ठेवल्याने धनप्राप्ती होते.
 
3) बेयडा मूळ
पुष्य नक्षत्रात बेयडा झाडाचे मूळ व त्याचे एक पान आणून पैसे ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवावे. या प्रयोगाने दारिद्र्य येणार नाही.
 
4) आकड्याचे मूळ
रवि-पुष्य नक्षत्रात आकड्याच्या झाडाचे मूळ उजव्या हातात धारण केल्याने आर्थिक समृद्धीत वृद्धी होते.
 
5) नायटी मूळ
सुख प्राप्तीसाठी पुनर्वसू नक्षत्रात नायटी वनस्पतीचे मूळ आणून शरीरावर लावावे.
 
6) वडाच्या झाडाचे पान 
आश्लेषा नक्षत्रात वडाच्या झाडाचे पान आणून भंडार गृहात ठेवावे, धनधान्यात भरभराटी राहते. धन लाभ हेतू वडाच्या झाडाच्या ताज्या पानावर हळदीने स्वस्तिक तयार करून पुष्य नक्षत्रात घरात ठेवावे.
 
7) पांढरे गोकर्णी
हे दारिद्र्यनाशक आणि ऐश्वर्य प्रदान करणारं असतं. ही वनस्पती अंगणात लावावी.
 
8) पांढरे पलाश
पांढरा पलाश दुर्लभ आहे आणि सापडल्यास श्रद्धा आणि विश्वासाने देवघरात स्थापित रावे. याने धनलक्ष्मीचे भंडार भरून जातात.
 
9) धोत्रा मूळ
धोतर्‍याच्या झाडाचे मूळ तांत्रिक विधीसाठी वापरले जाते. घरात स्थापित करून महाकालीचे पूजन करून 'क्रीं' बीज हे जप केल्याने धन संबंधी समस्या सुटतात.
 
हे वनस्पती जवळ ठेवल्याने असे होतंच त्यावर दावा केला जाऊ शकत नाही.