शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By वेबदुनिया|

शनीला प्रसन्न करण्यासाठी काही सोपे उपाय!

शनिवार हा दिवस शनी देवाचा दिवस आहे. ज्‍योतिषशास्‍त्रानुसार कुंडलीत शनीच्या स्थानाला खास महत्त्व असते. शनीच्‍या शुभ किंवा अशुभ स्थानामुळे मनुष्‍याच्‍या जीवनात सुख- दुखा:ची स्थिती निर्माण होते. शनीचा सर्वाधिक परिणाम साडेसातीमध्‍ये सहन करावा लागतो. प्रत्‍येक व्‍यक्‍तीला शनीची साडेसातीला सामोरे जावे लागते. 

शनीमुळे व्‍यक्‍तीला अत्‍याधिक दुख: किंवा अपयशाचा सामना करावा लागत असेल तर त्‍याने शनिवारी विशेष पूजा केली पाहिजे. शनीला प्रसन्‍न करण्‍यासाठी काही सोपे उपाय सांगण्‍यात आले आहेत. प्रत्‍येक शनिवारी खालील उपाय केल्‍यास लवकरच त्‍याचे शुभ फळ आपल्‍याला मिळेल.

शनीचे अशुभ प्रभाव कमी करण्‍यासाठी शनिवारी काळ्या वस्त्रात काळे उडीद, काळे तीळ आणि लोखंडाची वस्‍तू बांधावी. त्‍याची पूजा करून ते शनीदेवाला अर्पण करावे. त्‍यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्‍यक्तिस काळे वस्त्र आणि त्‍यात गुंडाळलेल्‍या वस्‍तू दान कराव्‍यात. प्रत्येक शनिवारी केल्‍यास काही दिवसातच त्‍याचे सकारात्‍मक फळ मिळण्‍यास प्रारंभ होईल.