गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: सोमवार, 21 जून 2021 (11:08 IST)

मिथुन व तुला नंतर या राशीवर प्रारंभ होईल शनीचा ढैय्या, जाणून घ्या तुमची राशी या महादशेत आहे का ?

शनिदेव न्यायाचे देवता आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव प्रत्येकाला त्यांच्या कर्मांनुसार फळ देतात. जे चांगले कार्य करतात त्यांना चांगले परिणाम मिळतात आणि जे वाईट कृत्य करतात त्यांना शिक्षा केली जाते. असे म्हटले जाते की शनीच्या अशुभ दशा आणि स्थानामुळे अशुभ परिणाम प्राप्त होतात. शनी एखाद्या शुभ ठिकाणी असल्यास व्यक्तीला चांगले परिणाम मिळतात. मिथुन आणि तुला राशीच्या लोकांसाठी सध्या शनी ढैय्या चालू आहेत. या दोन राशीनंतर शनीचा ढैय्या कोणत्या राशींवर राहणार आहे जाणून घ्या -
 
29 एप्रिल 2022 रोजी, राशी चक्र बदलत असताना, शनी स्वत⁚ च्या राशीतून मकर व कुंभात गोचर करेल. शनी कुंभ राशीत येताच मिथुन व तुला राशीवरून ढैय्या संपेल. यानंतर कर्क आणि वृश्चिक राशीत शनीचा ढैय्या सुरू होणार आहे. शनीच्या गोचरामुळे   धनू राशीच्या लोकांना देखील शनीच्या ढै्य्यापासून सुटकारा मिळेल. यासह मीन राशीवर शनीची साडेसाती सुरू होईल.
 
शनी ढैय्याचा प्रभाव-
शनी ढैय्यामुळे पीडित राशीच्या लोकांना कामात अडथळ्यांना तोंड द्यावे लागतात. करिअरमध्ये यश मिळविण्यात अडचणी येतील. शत्रूंची संख्या वाढू शकते. कौटुंबिक कलहाबरोबरच मानसिक तणावही कायम राहील.