बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (10:48 IST)

बुध ग्रहाच्या शांतीचे काही उपाय

बर्‍याच वेळा एकाद्या विशेष काळात एखादा ग्रह अशुभ फळ देतो, अशात त्यांची शांती करणे गरजेचे असते. गृह शांतीसाठी काही खास शास्त्रीय उपाय प्रस्तुत आहे. या पैकी कुठल्याही एखादा प्रयोग केल्याने देखील अशुभतेत कमी येते व शुभतेत वृद्धी होते. 
 
ग्रहांच्या मंत्रांची जप संख्या, द्रव्य दानाची सूची इत्यादी सर्वप्रकारची माहिती आपणास देत आहोत. मंत्र जप स्वयं करावे किंवा एखाद्या ब्राह्मणाकडून करून घ्यावे. दान द्रव्य सूचीत दिलेल्या पदार्थांना दान करण्याशिवाय त्यात लिहिलेले रत्न-उपरत्नांच्या अभावात जडी बुटीला विधिवत स्वयं धारण करावे, त्याने शांती मिळेल.
 
बुधासाठी : वेळ सूर्योदयापासून 2 तासापर्यंत.
 
विष्णूची पूजा-अर्चना करायला पाहिजे. विष्णू सहस्रनावाचा पाठ करावा. बुधाच्या मूल मंत्राचा पहाटे 5 घटीच्या आत पाठ करावा. 9,000 किंवा 16,000 पाठ 40 दिवस दररोज करायला पाहिजे.
मंत्र : 'ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम:।'
 
दान-द्रव्य : पन्ना, स्वर्ण, कासा, मूग, खांड, तूप, हिरवा कापड, सर्व प्रकारचे फूल, हाथी दात, कापूर, शस्त्रच फल.
 
बुधवारचा उपास करायला हवा. विष्णुचे पूजन करायला पाहिजे. 10 मुखी रुद्राक्ष धारण करावा.