बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (22:05 IST)

8 डिसेंबरपर्यंत या 6 राशींचे होतील भाग्योदय, करिअरमध्ये मिळेल नवीन संधी

ज्योतिषशास्त्रात शुक्र हा प्रेम आणि सौंदर्याचा कारक मानला जातो. शुक्राचे राशी परिवर्तन ही ज्योतिषशास्त्रातील महत्त्वाची घटना मानली जाते. शुक्र 30 ऑक्टोबर रोजी धनु राशीत प्रवेश केले होते. आता शुक्र 8 डिसेंबर 2021 रोजी रात्री 12.56 पर्यंत या राशीत राहील. यानंतर शुक्र मकर राशीत येईल. जाणून घ्या 8 डिसेंबरपर्यंत कोणत्या राशींना मिळतील शुभ फळ-
 
1. मेष- मेष राशीच्या लोकांच्या नवव्या घरात शुक्राचे भ्रमण झाले आहे. शुक्र गोचर  काळात तुम्हाला आध्यात्मिक क्षेत्रात यश मिळेल. या काळात नशीबही साथ देईल. घरच्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यावसायिकांना फायदा होईल. जुन्या आजारांपासून मुक्ती मिळू शकते.
2. मिथुन-  शुक्राचे गोचर तुमच्या विवाह घरामध्ये म्हणजेच सातव्या भावात झाले आहे. या काळात लग्न न झालेल्या लोकांचे लग्न ठरू शकते. गोचर  काळात तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेचे सुख मिळू शकते.
3. सिंह- शुक्र तुमच्या प्रेमाच्या घरात म्हणजेच पाचव्या भावात प्रवेश करेल. या दरम्यान तुम्हाला एकामागून एक यश मिळू शकते. समस्यांवर मात केली जाईल. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी वेळ अनुकूल आहे.
4. कन्या- शुक्र तुमच्या चौथ्या भावात प्रवेश करत आहे. गोचर काळात तुम्हाला कौटुंबिक जीवनात शुभ परिणाम मिळतील. आईसोबत चांगला वेळ घालवा. प्रेम जीवन चांगले होईल. प्रियजनांसोबत सहलीला जाण्याची शक्यता आहे.
5. वृश्चिक- शुक्र तुमच्या दुसऱ्या घरात प्रवेश करेल. शुक्र परिवर्तनाच्या प्रभावाने तुमच्या बोलण्यात गोडवा येईल. जमीन आणि वाहन खरेदीची संधी मिळेल. गोचर काळात तुम्हाला आनंद आणि सुविधा मिळतील. नोकरी व्यावसायिकांना प्रगतीच्या नवीन संधी मिळतील.
6. धनु - शुक्राचे गोचर तुमच्या पहिल्या घरात असेल. या काळात तुम्हाला रचनात्मक कार्यात यश मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील.
 
या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला जरूर घ्या.