रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: गुरूवार, 1 डिसेंबर 2022 (16:28 IST)

5 डिसेंबरला धनु राशीत शुक्राचे होणार गोचर, 5 राशीच्या लोकांच्या आयुष्यात धनाची भरभराट होईल.

shukra
शुक्र सोमवार, 5 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 05:39 वाजता धनु राशीत प्रवेश करेल आणि त्यानंतर 29 डिसेंबर रोजी दुपारी 03:45 वाजता मकर राशीत प्रवेश करेल. शुक्र हा धन, ऐश्वर्य, कला, सौंदर्य आणि संगीताचा कारक मानला जातो. शुक्राचेगोचर सुख-समृद्धीवर परिणाम करते. शुक्राच्या गोचरामुळे कोणकोणत्या 5 राशींना फायदा होईल जाणून घ्या.
 
1. मेष: तुमच्या राशीच्या नवव्या घरात बुधाचे गोचर शुभ आहे. यामुळे अचानक पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होईल आणि वैवाहिक जीवन देखील आनंदी होईल. भागीदारी व्यवसायात लाभ होईल. भाग्य तुमच्या सोबत राहील. तीर्थयात्रेचे योगही बनतील आणि धार्मिक कार्यातही रुची वाढेल.
 
2. कन्या: तुमच्या राशीच्या चौथ्या घरात शुक्राचे गोचर शुभ राहील. ते तुमच्या आरामात आणि सोयींमध्ये भर घालेल. लक्झरी वस्तूंच्या खरेदीवर तुम्ही जास्त खर्च करू शकता. तुमचे उत्पन्न वाढेल. नशीबही साथ देईल.
 
3. वृश्चिक: तुमच्या राशीच्या दुसऱ्या घरात शुक्राचे संक्रमण तुम्हाला अचानक आर्थिक लाभ देऊ शकते. कौटुंबिक आनंदासोबत कौशल्य विकास होईल. परदेशी व्यवसायात किंवा परदेशी कंपनीत काम केल्यास आर्थिक लाभ होईल. बचत आणि गुंतवणुकीसाठी हा काळ शुभ आहे.
 
4. धनु: तुमच्या राशीच्या पहिल्या घरात शुक्राचे गोचर तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक बनवेल. तुम्ही व्यायाम आणि ग्रूमिंगकडे अधिक लक्ष द्याल. या गोचरामुळे  तुमची आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. तुमची कमाई वाढेल. वैवाहिक जीवन सुखकर राहील आणि भागीदारी व्यवसायात फायदा होईल.
 
5. कुंभ: तुमच्या राशीच्या अकराव्या घरात शुक्राचे गोचर तुम्हाला अचानक आर्थिक लाभ देऊ शकते. तुम्ही विविध स्रोतांमधून उत्पन्न मिळवण्यास सक्षम असाल. जर तुम्ही व्यापारी असाल तर चांगला फायदा होईल. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. प्रेमसंबंध वाढतील.

Edited by : Smita Joshi