शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

या 3 राशीच्या लोकांनी चुकूनही लाल रंगाची गाडी खरेदी करू नये, तुमच्या राशीसाठी हा रंग भाग्यशाली ठरणार

Lucky Colour For Vehicle As Per Your Zodiac Sign ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार वाहन सुख विशेषत: शुक्र आणि शनीच्या कृपेवर अवलंबून असते. कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जीवनात वाहन सुख तेव्हाच प्राप्त होते जेव्हा त्याच्यावर शनि आणि शुक्राची कृपा असते. असे म्हणतात की कुंडलीत शुक्र जेव्हा चांगल्या स्थितीत असतो तेव्हा वाहन सुख नक्कीच मिळते, मग ते वाहन स्वतःचे असो किंवा दुसऱ्याचे. चला जाणून घेऊया ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्या राशीसाठी कोणत्या वाहनाचा रंग शुभ आहे.
 
मेष
ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार मेष राशीच्या लोकांसाठी लाल रंग शुभ आहे. याशिवाय या राशीच्या लोकांसाठी गोल्डन, सिल्वर, पिवळ्या किंवा केशरी रंगाची वाहनेही तितकीच फायदेशीर ठरतील. वाहनात हनुमानाची मूर्ती लावणे शुभ ठरेल
 
वृषभ
ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ राशीच्या लोकांसाठी पांढऱ्या रंगाची वाहने खरेदी करणे शुभ असते. तर या राशीच्या लोकांनी लाल रंगाची वाहने वापरणे टाळावे. वाहनात शिवाची मूर्ती बसवल्यास शुभ होईल.
 
मिथुन
मिथुन राशीच्या जातकांनी क्रीम किंवा हिरव्या रंगाचे वाहन खरेदी करावे. हे त्यांच्यासाठी शुभ ठरेल. या लोकांनी आपल्या वाहनात गणपतीची मूर्ती स्थापित केली पाहिजे.
 
कर्क
ज्योतिष शास्त्रानुसार कर्क राशीच्या लोकांनी पांढर्‍या किंवा लाल रंगाचे वाहन खरेदी केले पाहिजे. या राशीच्या लोकांनी कारमध्ये हनुमानजींची मूर्ती स्थापित केल्यास त्यांच्या जीवनात शुभफळ कायम राहतात.
 
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी ग्रे शेडमध्ये वाहन खरेदी करणे शुभ ठरतं. वाहनात गायत्री मंत्र लिहिणे शुभ ठरेल.
 
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी पांढर्‍या किंवा निळ्या रंगाची वाहने शुभ ठरतात. या लोकांनी लाल रंगाचे वाहन घेणे टाळावे. गाडीत भगवान कृष्णाची स्थापना करावी.
 
तूळ
तूळ राशीच्या जातकांनी निळ्या रंगाचे वाहन खरेदी करावे. यापुढे एक लहानसं स्वस्तिक लावावे.
 
वृश्चिक
या राशीच्या लोकांसाठी पांढर्‍या रंगाचे वाहन खरेदी करणे उत्तम ठरेल. हिरवे आणि काळे रंगाचे वाहन खरेदी करणे टाळावे. गाडीत शिवाचे चित्र किंवा मूर्ती लावावी.
 
धनू
लाल आणि सिल्वर शेड्सचे वाहन धनू राशीच्या जातकांसाठी फायद्याचे ठरतात. काळे आणि निळे शेड्सचे वाहन घेणे टाळावे. वाहनात हनुमान चालीसा ठेवावी.
 
मकर
या राशीच्या लोकांसाठी पांढरा, ग्रे किंवा स्लेटी शेड्सचे वाहन उत्तम ठरतात. लाल आणि निळ्या रंगाची वाहने टाळा. श्रीकृष्णाची मूर्ती वाहनात ठेवावी.
 
कुंभ
निळ्या, पांढऱ्या आणि राखाडी शेड्सची वाहने या राशीच्या लोकांना शुभ ठरतील. वाहनात शंकराची प्रतिष्ठापना करा.
 
मीन
मीन राशीच्या लोकांनी शक्यतो गोल्डन, पिवळ्या किंवा पांढर्‍या रंगाचे वाहन खरेदी करावे. तसेच वाहनात हनुमानजींचे चित्र ठेवावे.