1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 21 जुलै 2014 (16:25 IST)

उत्साहवर्धक चहा

भारतात राष्ट्रीय पेयाचा दर्जा प्राप्त झालेल्या चहाने दिवसाची सुरुवात करणारे अनेक जण आहेत.

सर्वसामान्यांपासून ते वरिष्ठांपर्यंत सर्वच जण चहाचा वापर करतात. चहा घ्यावा का घेऊ नये, या वादाच्या भोवर्‍यात अडकण्यापेक्षा अल्प प्रमाणात त्याचा स्वाद घेतलेला निश्‍चितच गुणकारी ठरतो. चहा सर्दी, खोकला, डोकेदुखी, नाक गळणे, डोळ्यांतून पाणी येणे, शिंका येणे, जडत्व जाणवणे इत्यादींवर गुणकारी आहे.

चहामुळे शरीराला स्फूर्ती येते. थकवा नाहीसा होतो. संशोधकांच्या मते हृदयरोग, उच्च रक्तदाब, कर्करोग आणि मेंदूरोग या सर्वांवर चहा हे एक गुणकारी आणि लाभदायी पेय आहे.

आयुर्वेदाचार्यांच्या मतानुसार चहामुळे मानसिक संतुलन राखण्याचे कार्य सुकर होते. मात्र चहाचा अतिरेक करू नये. चहाच्या अतिसेवनाने अँसिडिटी वाढते. भूक मंदावते. दात खराब होतात. निद्रानाश असलेल्या किंवा मादक द्रव्य सेवन करणार्‍या व्यक्तींनी चहा पिऊ नये.