बर्याच लोकांना पित्तामुळे पोटात दुखते. त्यांची जागाही ठराविक आहे. ती म्हणजे बरगड्या संपून ज्या ठिकाणी पोटाचा भाग सुरु होतो तेथे व छातीचे मधले हाड जेथे खालच्या बाजूला संपते, त्या त्रिकोणी खळण्यात दुखते. त्याचवेळेला घशात कडू, आंबट, तिखट, गुळण्या येतात. छातीत जळजळते व क्वचितप्रसंगी पोटात गॅसही धरतो. अशा वेळी, उलटी काढून पित्त काढून टाकावे. मोरावळा खावा. त्यावेळी साधा आहार घ्यावा, त्या मध्ये मुख्यत: गार दूध घेतले तरी पित्ताचा जोर कमी होतो. तो थोडा कमी झाला की मग तूप-भात, तूप-भाकरी यासारखा सौम्य आहार घ्यावा. डाळिंबाचा रस पिण्यास हरकत नाही त्याने पित्तही कमी होते. पित्ताने पोट दुखत असले की शक्यतो जेवणाची इच्छा होत नाही म्हणून मिल्क शेक, फ्रूटज्यूस घ्यावा.