गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : रविवार, 7 एप्रिल 2024 (10:08 IST)

रोज जेवणात सेवन करत आहात का तिखट हिरवी मिर्ची, जाणून घ्या नुकसान

Green Chilli Side Effects
हिरवी मिर्ची पोटातील जळजळ आणि एसिडिटी वाढवते. डोकेदुखी, चककर येणे, मळमळ यांसारख्या समस्या होऊ शकतात. अनेक लोक जेवण करतांना हिरवी मिर्ची आवडीने खातात. हिरवी मिर्ची जेवणातील चव वाढवते. पण तुम्हाला महित आहे का हिरवी मिर्ची सेवन केल्यास आरोग्याला खूप नुकसान होऊ शकते. चला जाणून घेऊ या हिरवी मिर्ची खाण्याचे तोटे 
 
1. पोटासंबंधित समस्या- 
तिखट हिरव्या मिर्ची मध्ये असलेले कैप्सेसिन नावाचे तत्व जास्त प्रमाणात पोटातील जळजळ आणि एसिडिटीला वाढवतात. हिरवी मिर्चीच्या अधिक सेवनाने पोटामध्ये दुखणे आणि अपचनाची समस्या वाढू शकते.  
 
2. मेंदु संबंधी समस्या-
तिखट हिरव्या मिर्ची मध्ये असलेले कैप्सेसिन मुळे मेंदूमध्ये ब्लड सर्कुलेशन वाढते ज्यामुळे डोकेदुखी, चक्कर, मळमळ यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. 
 
3. गॅस आणि एसिडिटी- 
तिखट हिरव्या मिर्चीच्या सेवनाने पोटामध्ये गॅस बनण्याची समस्या होऊ शकते आणि एसिडिटी वाढू शकते. हे विशेषकरून त्या लोकांसाठी घातक असते. ज्यांना पहिल्या पासूनच गॅस आणि एसिडिटीची समस्या असते. 
 
4. पोटाचे आजार-  
तिखट हिरवी मिर्चीच्या अधिक सेवनाने पोटाचे काही आजार वाढतात. जसे की पोटामध्ये संक्रमण, गैस्ट्राइटिस, विषाक्तता. 
 
5. त्वचेची समस्या- 
तिखट हिरव्या मिर्चीच्या सेवनाने काही लोकांना त्वचे संबंधित समस्या होऊ शकते. जसे की चर्म रोग, त्वचा जळजळ किंवा एलर्जी. 
 
या सर्व नुकसान लक्षात ठेऊन जेवणात तिखट हिरव्या मिर्चीचे सेवन कमी करावे. आपण आपल्या आरोग्याचा सन्मान करायला हवा. तसेच आपल्या जेवण आरोग्यदायी असण्याकरिता संतुलित आहाराचे सेवन करावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik