गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 4 एप्रिल 2021 (08:10 IST)

काय सांगता,परफ्युमचा अति वापर धोकादायक असू शकतो

उन्हाळ्यात घाम आणि शरीराची गंध टाळण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे ब्रॉड परफ्यूम वापरतो. कालांतराने महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या परफ्यूमची बाजारात विक्री सुरू झाली आहे.याचा वापर केल्याने शरीराची दुर्गंध नाहीशी होते. परंतु याचा जास्त वापर केल्याने हे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. या मध्ये रसायन असतात जे कर्करोगासारखे गंभीर आजार करू शकतात. तज्ज्ञ सांगतात की या मध्ये वास टिकवून ठेवण्यासाठी कंपन्या असे रसायन वापरतात ज्यांच्या संपर्कात येऊन अनेक गंभीर आजार होऊ शकतात.चला तर मग जाणून घेऊ या कोणते आजार उद्भवू शकतात.
*हे त्वचेसाठी देखील हानिकारक आहे .त्वचेची संबंधित आजार देखील उद्भवू शकतात. जळजळ होऊ शकते. त्वचेवर डाग, पुरळ येऊन जळजळ होते. 
* वंध्यत्व आणि कर्करोग सारखे गंभीर रोग होऊ शकतात.
*  मज्जा तंत्राशी निगडित त्रास संभवतात. मेंदूच्या विकासाशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकते.