बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By वेबदुनिया|

आरोग्यासाठी उपयुक्त ऑलिव ऑईल

हल्ली सर्वांनाच ऑलिव ऑईल चे रोजच्या जेवणातील महत्व पटत चालले आहे. ऑलिव ऑईल चा वापर जेवणात केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कामी होऊन रक्तदाबाची पातळी देखील आटोक्यात येते, तसेच रोगप्रतिकार क्षमता पण वाढते. पण याच बरोबर केस आणि त्वचेच्या उत्तम निगराणी साठी देखील ऑलिव ऑईल उपयोगी ठरते. पाहूया ऑलिव ऑईल चे काही फायदे:

१) त्वचा तुकतुकीत होण्याकरिता.

२) थंडी मध्ये त्वचेची सुरक्षा करण्याकरीता.

३) सनबर्न पासून संरक्षण होण्यासाठी.

४) त्वचे वरील स्ट्रेच मार्क्स घालवण्याकरीता.

५) केस सिल्की आणि सुंदर करण्याकरीता.

६) केसांच्या फाटे फुटण्या पासून मुक्ती मिळविण्याकरीता.

७) कोंड्या पासून मुक्ती मिळविण्याकरीता.

ऑलिव ऑईल हे त्वचा, केस, आणि आरोग्याकरीता देखील उपुक्त असे तेल आहे, म्हणून प्रत्येकाच्या घरात ऑलिव ऑईल हे असायलाच हवे.

मीरा कुळकर्णी