रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 9 मे 2021 (16:52 IST)

पीसीओडी चा त्रास असल्यास हे अवलंबवा

पीसीओडी आज महिलांमध्ये होणार सर्वात सामान्य आजार आहे.हा जरी एक सामान्य आजार असला तरी हा धोकादायक असू शकतो.  
 
हा आजार स्त्रियांमध्ये आणि मुलींमध्ये दिसून येत आहे. या मुळे थॉयराइड,मासिक पाळीचा त्रास, अवांछित केस येणं वजन वाढणे, या सारख्या समस्या उद्भवतात.या वर वेळीच लक्ष दिले गेले नाही तर कर्करोगासाखे गंभीर आजार होऊ शकतात. वेळीच या कडे लक्ष द्या. या साठी काही उपाय सांगत आहोत चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 आहार- आपल्या आहारात प्रथिने,कार्बोहायड्रेट,फायबर चा समावेश करावा. हे आपले वजन कमी करण्यात मदत करतात. प्रयत्न करा की दर 3 तासानंतर खात राहा. डॉ.च्या सल्ला घेऊन आपण मल्टीव्हिटॅमिन देखील घेऊ शकता. 
 
2 व्यायाम- पीसीओडी आणि पीसीओएस जाणून घेतल्यानंतर आपल्या जीवनशैली मध्ये बदल करा. या दोन्ही आजारांचे मुख्य कारण आहे खराब जीवनशैली. योग्य आहार घेण्यासह शारीरिक हालचालीवर देखील कार्य करा.सुरुवातीस लहान वर्कआउट देखील करू शकता.आपण जॉगिंग, एरोबिक्स, वॉक, योगासारख्या शारीरिक क्रियाकलाप सुरू करू शकता 
 
3  जंक फूड - जंक फूड आपल्या आयुष्यासाठी त्रासदायक होऊ शकते. जर आपल्याला पीसीओडी आणि पीसीओएस बद्दल माहिती आहे तर जंक फूड खाणं टाळा. जंक फूड मध्ये मैदा,चीझ,तेल या सारख्या गोष्टी आढळतात. हे लठ्ठपणा वाढवते. लठ्ठपणा वाढल्यावर पीसीओडी आणि पीसीओएस सारखे आजार देखील वाढतात. 
 
4 या आजारामध्ये साखरेचे प्रमाण कमी करा. या मुळे वजन नियंत्रित राहील.साखरेच्या ऐवजी आपण गूळ देखील वापरू शकता. 
 
5 तणाव -पीसीओडी रोग बर्‍याचदा तणावामुळे होतो. म्हणून आपण कोणत्याही गोष्टीचा तणाव घेऊ नका. सकारात्मक विचारांसह एखाद्या कामाला सुरु करा. कारण सकारात्मक विचारसरणीमुळे एखाद्या रोगापासून त्वरित बाहेर पडण्यास मदत मिळते.