मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 14 एप्रिल 2021 (21:27 IST)

Summer Fruits उन्हाळ्यात फळं या प्रकारे ठेवा फ्रेश

टरबूज उन्हाळ्यात सेवन करणे अत्यंत फायद्याचं आहे. टरबूजला रूम टेम्प्रेचरवर तोपर्यंत स्टोर करता येईल जोपर्यंत कापलेलं नसेल. परंतू यावर ऊन पडता कामा नये. अख्खं टरबूज सावलीत 6 दिवसांपर्यत टिकतं.
 
जर आपण टरबजू कापलं असेल तर रॅप करुन फ्रिजमध्ये ठेवावं. याने इतर पदार्थांचा वास टरबजूला लागणार नाही. याप्रकारे दोन दिवस टरबूज स्टोर करता येतं. 
 
टरबजू स्टोर करण्यासाठी याचे सालं काढून तुकडे करुन एखाद्या एअरटाइट डब्यात देखील ठेवता येतं. डबा फ्रिजमध्ये ठेवावा. या प्रकारे देखील दोन दिवस टरबूज वापरता येतं.
 
आंबा स्टोर करण्यासाठी 
आंबे स्टोर करण्यासाठी आपण ते बास्केटमध्ये ठेवू शकता ज्यात वारं येत असेल. ऑक्सीजन ब्लॉक केल्याने आंबे खराब होतात. यांना फ्रिजमध्ये ठेवणयाची गरज नसते. कच्चे आंबे असल्यास आठ दिवसात पकून जातात.
 
पकलेले आंबे रूम टेम्प्रेचरवर दोन दिवस चांगले राहतात. आपल्या फ्रिजमध्ये ठेवायचे असतील तरी बास्केटमध्ये ठेवा. किंवा पेपर बॅगमध्ये पॅक करुन ठेवावे. याप्रकारे 6 दिवस आंबे टिकू शकतात.