शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 13 जून 2021 (08:30 IST)

पेपरमिंट चे 5 आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

आपल्या सर्वांना पेपरमिंट माहित आहे. हे आपल्या आजीच्या काळापासून वापरले जात आहे. पेपरमिंट वनस्पती सुमारे 30 ते 60 सेमी उंच आणि सुवासिक वनस्पती आहे. हे आपल्याला बर्‍याच आजारांपासून मुक्त होण्यास मदत करते. त्याचा रस आणि तेल इत्यादी औषधांसाठी वापरतात.

याला बर्‍याच वेगवेगळ्या नावांनी देखील संबोधले जाते. संस्कृतमध्ये त्याला सुंधितपत्र, हिंदीमध्ये पेपरमिंट किंवा विलायती पुदिना, गुजराती पुदिनो, मराठी पेपरमिंट आणि इंग्रजीमध्ये ब्रांडी मिंट असे म्हणतात.
चला पेपरमिंट चे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊ या.
 
1 खोकला आणि सर्दी- हवामान बदलल्यामुळे बऱ्याच लोकांना सर्दी-खोकला होतो.या सर्दी खोकल्यात आराम मिळण्यासाठी पेपरमेन्ट खूप प्रभावी आहे.अशा लोकांनी पेपरमिंटची वाफ घेतल्याने कफ,सर्दी मध्ये आराम मिळतो.
 
2 दातदुखी -पेपरमिंटचा वापर दातदुखी मध्ये खूप फायदेशीर आहे .आजच्या काळात, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकजण दातदुखीच्या समस्येने त्रस्त आहे. यासाठी,पेपरमिंट वेदना असलेल्या दाताच्या मध्ये ठेवा त्यामुळे वेदना कमी होण्यास आराम मिळतो.
 
3 अतिसार- खाण्यात पिण्यात दुर्लक्ष केल्यास अतिसार होणे सामान्य बाब आहे. अशा वेळी पेपरमिंटच्या पानाचा 5 ते 10 मिलिग्रॅम काढा बनवून प्यायल्याने मुरडयुक्त अतिसारात आराम मिळतो आणि पोटाशी निगडित त्रास दूर होण्यास आराम मिळतो.
 
4 पोटदुखी -बऱ्याच वेळा जास्त चमचमीत गरिष्ठ मसालेदार खाल्ल्याने पोटात गॅस,अपचन आणि पोटदुखी,अस्वस्थता जाणवते.पोट दुखी पासून आराम मिळण्यासाठी 25 मिग्रॅ पेपरमिंटची पाने वाटून त्याच्या रसात साखर घालून सेवन केल्याने पोटदुखीत आराम मिळतो. 
 
5 केसांची गळती- केस गळतीच्या समस्येपासून त्रस्त आहात तर यासाठी पेपरमिंट तेलाचा वापर करा.नारळाच्या तेलात पेपरमिंटच्या तेलाच्या काही थेंबा मिसळून डोक्याची मॉलिश करा हे तेल 15 ते 20 मिनिट लावून ठेवा.नंतर शाम्पू करून केस स्वच्छ धुवून घ्या.