शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By नेहा रेड्डी|
Last Modified: बुधवार, 24 जून 2020 (07:38 IST)

Hand Sanitizer At Home : नैसर्गिक वस्तूंनी तयार करा सॅनेटाईझर Expert Advice

सध्याचा काळात हातांना स्वच्छ करण्यासाठी साबणाच्या जागी हॅन्ड सेनेटाईझरचे वापर जास्त प्रमाणात केले जात आहे. हॅन्ड सेनेटाईझर आपल्या हातातील सूक्ष्म जंताना आणि कीटकांना काढून टाकतं, त्याच बरोबर ह्याचा वापर केल्यानंतर हाताला छान सुवास येतो. पण बऱ्याच लोकांना वारंवार हात धुण्याची सवय असते. प्रत्येक लहान आणि मोठ्या कामामध्ये हात घातल्यावर त्यांना असे वाटते की आपले हात चांगल्या प्रकारे पाण्याने स्वच्छ होणार नाही, त्यामुळे ते पुन्हा पुन्हा सेनेटाईझरचा वापर करत असतात. 
 
कोरोना व्हायरसला टाळण्यासाठी स्वच्छतेवर भर टाकली जात आहे. हाताला देखील स्वच्छ ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे लोक हॅन्ड सेनेटाईझर जास्त प्रमाणात वापरत आहे जेणे करून जंत आणि कीटकांचा नायनाट होईल. काही जण घरात देखील साबणाने हात धुण्यापेक्षा हॅन्ड सेनेटाईझरचा वापर करण्यास जास्त प्राधान्य देत आहे. 
 
पण आपणास हे ठाऊक आहे की या हॅन्ड सेनेटाईझरचा जास्त वापर केल्याने हाताची त्वचा कोरडी होण्यास सुरुवात होते. हॅन्ड सेनेटाईझरमध्ये ट्रायक्लोसन नावाचं केमिकल असतं जे हाताची त्वचा शोषून घेतं. ह्याचा जास्त वापर केल्याने हे त्वचेतून आपल्या रक्तामध्ये मिसळून जातं. रक्तामध्ये मिसळून हे आपल्या स्नायूंच्या ऑर्डिनेशनला इजा करतं. जर का आपण आपले हात स्वच्छ करण्यासाठी हॅन्ड सेनेटाईझरचा वापरच करणार आहात तर आपण नैसर्गिक वस्तूंचा वापर करून तयार केलेल्या  हॅन्ड सेनेटाईझरचा वापर करू शकता. जेणे करून आपल्या त्वचेला आणि आरोग्यास काहीही इजा होणार नाही. 
 
आता आपण विचार करत असाल की नैसर्गिकरीत्या हॅन्ड सेनेटाईझर कसे तयार करता येईल. तर आपणास काळजी करण्याची काहीही गरज नाही. या लेखामध्ये आम्ही आपल्याला नैसर्गिक वस्तूंचा वापर करून हॅन्ड सेनेटाईझरचा तयार करायला सांगणार आहोत त्याच बरोबर तज्ज्ञाचा सल्ला देखील जाणून घ्या.....
 
कोरफड 1/3 कप, कडुलिंब आणि लवंगाच्या तेलाच्या 10 ते 15 थेंब, व्हिटॅमिन ई, आणि एक स्वच्छ बाउल. या मध्ये सर्व साहित्य मिसळून काही वेळ ठेवून द्या. नंतर हे मिश्रण स्वच्छ रिकाम्या बाटलीमध्ये भरून ठेवा.
 
डिस्टिल्ड वॉटर मध्ये मीठ, कोरफड जेल, आवश्यक तेल (लवंग, लिंबू, व्हिटॅमिन ई, कडुलिंब) ह्यांचा 10 ते 15 थेंब मिसळा. आता ह्याला एका स्वच्छ बाटलीमध्ये काढून घ्या.

तज्ज्ञाचा सल्ला :
पर्यावरण तज्ज्ञ पद्मश्री जनक पलटा मॅगिलिगन यांच्या मते नैसर्गिक सेनेटाईझर तयार करण्याची विधी जाणून घेऊया.
 
100 ग्राम ताज्या कडुलिंबाच्या कोळ्या डहाळ्यासह 50 ग्राम रिठ्याचे पान, कोरफडाचा 1 तुकडा, 40 मिनिटे 2 लीटर पाण्यामध्ये उकळा, नंतर थंड करून गाळून घ्या. आता यात 1 इंच तुरटीचा खडा आणि अर्ध्या इंचापेक्षा कमी लहान कापूर टाका आणि याला एकाद्या स्प्रे बाटलीत भरून ठेवा. अश्या प्रकारे ह्याला वापरू शकतो आणि हे नियमित बनवू शकतो, जसे की आपण चहा बनवतो. हे विनामूल्य आहे आणि बाहेर जाण्याचं काहीही जोखीम नाही.