बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (17:39 IST)

Mixed Fruit Juice Side Effects: सर्व फळांचा एकत्रित रस सेवन केल्याने होणारे नुकसान

Fruits
आरोग्यदायी शरीर आणि मेंदूसाठी आपण सर्व आपल्या डाइटमध्ये ज्यूस सहभागी करत असतो. काही लोक फळांमध्ये असलेल्या विटामिन्स अधिक प्रमाणात लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या रसांना एकत्रित करतात आणि मिक्स फ्रूट ज्यूस सेवन करतात वेगवेगळ्या फळांना एकत्रित करून त्यांचा रस सेवन केल्याने नुकसान होते. एकत्रित फळांचा रस सेवन केल्यास होणारे नुकसान जाणून घ्या. 
 
पोषक तत्वांचे नुकसान 
वेगवेगळ्या फळांचा एकत्रित रस मिक्स केल्याने सगळ्या फळांचे न्यूट्रिएंट्स मध्ये बदल होऊ शकतो. तज्ञांच्या मते काही फळांमध्ये एंजाइम किंवा कंपाउंड असू शकतात. जे दुसऱ्यांसोबत मिसळल्यावर चांगल्या प्रकारचे परिणाम देणार नाहीत यामुळे शरीराला नुकसान होईल. 
 
पाचन संस्थेत समस्या 
काही फळांचा रस एकत्रित करून सेवन केल्याने पाचन संबंधी समस्या निर्माण होतात जसे की गॅस , सूज, उचकी, बद्धकोष्टता या समस्या येऊ शकतात. विशेष:ता आंबट फळांचा रस दुसऱ्या फळांसोबत मिक्स केला गेला तर त्यातील आम्ल घटक पाचन संस्थेला प्रभावित करू शकतात. 
 
असंतुलित पोषक तत्व 
फळांच्या रसाला एकत्रित सेवन केल्याने त्यातील न्यूट्रिएंट्स असंतुलित होऊ शकतात. कारण यासाठी की काही फळांमध्ये विटयामिन, खनिज किंवा साखरेचे प्रमाण अधिक असते. जर सावधानी बाळगली नाही तर यामुळे पूर्ण शरीरावर नकरात्मक प्रभाव पडेल. 
 
ब्लड शुगर पातळीत चढ़-उतार  
काही फळांमध्ये साखरेचे प्रमाण ज्यास्त प्रमाणात असते. अशात जर सर्व फळांचा एकत्रित रस सेवन केला तर ब्लड शुगर पातळीत लवकर वाढ होऊ शकते. हे चिंतेचे कारण ठरू शकते. विशेष करून ज्यांना डायबिटीज आहे त्यांना समस्या येऊ शकते याकरिता प्रयत्न करा की प्रत्येक फळाचा रस वेगवेगळा सेवन करणे.