गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

लठ्ठपणा कमी करण्यासाठी या 4 पदार्थांपासून जरा लांबच राहा

हल्लीच्या जीवनशैलीत प्रत्येकजण लठ्ठपणामुळे परेशान आहे. वजन कमी करण्यासाठी कधी डायटिंग तर कधी व्यायाम तर कधी काय...तरी यश हाती लागत नसेल तर सर्वात मोठं कारण आहे की आपल्या डेली डायटमध्ये सामील अशा 4 वस्तू ज्यामुळे आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. जर या वस्तूंचे सेवन करताना आपण काळजी घेतली नाही तर परिणाम वाईट होऊ शकतात. 

 
मीठ
आपण मिठाचे अधिक सेवन करत असाल तर हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरेल. एका शोधाप्रमाणे एका दिवसात एक ग्रॅमहून अधिक मीठ सेवन केल्यास लठ्ठपणा वाढू शकतो. संतुलित प्रमाणापेक्षा अधिक मीठ खाणार्‍यांचे वजन इतर लोकांपेक्षा अधिक असतं. तसेच पॅक्ड पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण अधिकच असतं. 


 
साखर
गोड प्रत्येकाला आवडतं परंतू अधिक प्रमाणात साखर नुकसान करते. कारण साखरेमुळे लठ्ठपणा जलद गतीने वाढतो आणि नंतर यावर नियंत्रण ठेवणं कठिण जातं. आपण आपल्या दररोज आहारात साखरेचे प्रमाण कमी करून वजन कमी करू शकता. चांगल्या आरोग्यासाठी पुरुषांनी दररोज 50 ग्राम आणि महिलांनी 70 ग्रॅमहून अधिक साखरेचे सेवन करू नये.


 
तांदूळ
आपण तांदूळ खाण्याचे शौकीन असाल तर लठ्ठपणा कमी करणे जरा अवघड आहे. पांढर्‍या तांदळात कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असल्यामुळे लठ्ठपणा वाढतो. वजन कमी करण्याची इच्छा असल्यास पांढर्‍याऐवजी ब्राऊन राईसचे सेवन करावे.


 
मैदा
मैदा आणि मैद्याने तयार खाद्य पदार्थांचे सेवन केल्याने लठ्ठपणा कधीच कमी होणार नाही. कारण मैद्यामुळे शरीरात ब्लड शुगर वेगानं वाढतं ज्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि कर्करोग या सारखे आजार होण्याची शक्यता वाढते.