सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

थायरॉईडची लक्षणे आणि उपाय

पुरुषांच्या तुलनेत महिलांना शारीरिक आणि मानसिक ताण तणावांचा सामना जास्त प्रमाणात करावा लागतो। धावपळीची जीवनशैली आत्मसात करणार्‍या महिलांमध्ये थायरॉईड ही जणू काय सर्वसामान्य गोष्ट बनलीय. थायरॉईडच्या 100 रुग्णांमध्ये 80 रुग्ण या महिला असतात, असं एका अध्ययनातून समोर आलंय. 
 
थायरॉईड तीन प्रकारचे असतात परंतु यामध्ये सर्वात आघाडीवर आहे तो म्हणजे हायपोथारयाइडिज्म. रक्ताची चाचणी झाल्यानंतरच या प्रकारच्या थायरॉईडच्या लक्षणांचे संकेत मिळतात.
 
आपल्या गळ्याच्या समोरच्या भागात ज्या ग्रंथी असतात त्यांना थायरॉईड म्हटलं जातं. यातून एक प्रकारचे हार्मोन्स निघतात ज्यांना थायरॉईड हार्मोन म्हटलं जातं. या हार्मोनमुळे आपल्या शरीराच्या अवयवांच्या क्रिया नियंत्रित होतात.
 
जेव्हा तुम्ही थोडं जास्त काम केलं तरी तुम्हाला थकावटीची जाणीव होते किंवा तुमचं वजन अचानक वाढायला लागतं किंवा शरीराच्या विविध भागांत मंद-मंद दुखायला लागतं किंवा त्वचा आणि केसांमध्ये कडकपणा जाणवायला लागतो किंवा छोट्या छोट्या गोष्टींमुळे नेहमी ताण-तणावात दिसू लागता तर समजून जा की तुम्हालाही हायपोथायराइडिज्मची समस्या आहे.
 
यावर उपाय म्हणजे, कॅफीन आणि शर्करेचं प्रमाण एकदम कमी करा. याशिवाय, शरीरात शर्करेचं प्रमाण वाढवणार्‍या इतर पदार्थांचं प्रमाणही कमी करा. खाण्यात प्रोटिनचं प्रमाण वाढवा. शरीरात प्रोटिनच थायरॉईड हार्मोन्सला ढकलून टिश्यूजपर्यंत पोहचवतात. खाण्यात प्रोटिनचं प्रमाण वाढवल्यानं थायरॉईडची कार्यप्रणाली सामान्य केली जाऊ शकते. या आजारात वजन वाढण्याची समस्या उद्भवू शकते.
 
वजन कमी करण्याच्या नादात अनेकदा रुग्ण फॅट सोडून देतात यामुळे शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडलं जातं. अशा वेळी शरीराची गरज पूर्ण करणारे फॅट घेणे गरजेचे असते. हे फॅट हेल्दी असतील याची जरुर काळजी घ्या. 
 
थायरॉइडची अनेक लक्षणं पोषक पदार्थांच्या सेवनानं दूर होऊ शकतात. या आजारात महिलांमध्ये विशेषतः आयर्नची कमतरता भासते. अशा वेळी त्यांना आयर्नसोबतच इतर पोषक पदार्थही मोठ्या प्रमाणात घ्यायला हवेत. स्वस्थ राहण्यासाठी संतुलित भोजन जरूर करा.
 
साभार : अवंती कारखानीस